उन्हाळा सुरू झालाय. घरोघरी दिवसा-रात्री एसी सुरू झालाय. एसी लावून चांगलं, आरामदायी वाटत असलं तरी महिन्याच्या शेवटी जे बिल येतं, ते पाहून एसीतही घाम फुटू शकतो. बिल कमी यावं म्हणून या काही टिप्स.
2/ 5
एसीच्या फिल्टरला वेळोवेळी साफ करा. त्यात धूळ जमा होते. धूळ जमा झाल्यानं काँप्रेसरवर प्रेशर येतं आणि वीज जास्त लागते.
3/ 5
एसी आणि पंखा एकत्र सुरू करू नका. अनेक जणांना वाटतं यामुळे रूम लवकर थंड होईल. पण तसं होत नाही. उलट पंखा लावल्यानं एसीची थंड हवा बाहेर फेकली जाते आणि एसी पुन्हा आॅन होतो. तेव्हा दोन्ही उपकरणं एका वेळी सुरू करू नका.
4/ 5
एसीबरोबर तुम्हाला पंख्याचीही हवा हवी असेल तर टेबल फॅन सुरू करा. तो तुमच्या शरीरावर थंड वारा सोडेल आणि एसी अख्खी रूम थंड करेल.
5/ 5
एसी 22 ते 24 वर ठेवा. त्याहून कमी ठेवला तर जास्त वीज खर्च होते.