तुम्हाला बँकेत बचत खातं सुरू करायचंय? पण बँकेत जायला वेळ नाही. तुम्ही आता घरबसल्या खातं उघडू शकता. IDBI बँकेनं ही सुविधा सुरू केलीय. तुमच्याकडे आधार ई-केवायसी किंवा QR कोड पद्धतीनं तुम्ही खातं सुरू करू शकता. फक्त तुमच्याकडे हवा तुमचा स्मार्ट फोन. तुम्ही घरबसल्या हे काम झटपट करू शकता. IDBI वर LIC चा मालकी हक्क आहे. RBIच्या नव्या पत्रकात ही बँक आता खाजगी झाल्याचं म्हटलंय. या सुविधेमुळे तुम्हाला कागदपत्रांपासून मोकळीक मिळेल. काम झटपट होईल.नंतर ग्राहक बँकेत जाऊन पासबुक, चेकबुक घेऊ शकतात.