Aadhaar-Voter ID Link: आधारशी वोटर आयडी कार्ड असं करा लिंक, पाहा सोपी प्रोसेस
20 डिसेंबर रोजी मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी लिंक करण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक 2021 सादर केलं. मतदार यादीत डुप्लिकेट आणि बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याची माहिती आहे. Aadhaar Card Voter ID कार्डशी लिंक करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे.