

मी 'एसआयपी'त गुंतवणूक तर सुरू केलीय, पण त्याचा मला फायदा होतोय की नुकसान?असा प्रश्न गुंतवणुकदारांकडून कायम विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर देताना अर्थतज्ञ सांगतात की...


म्यूचुअल फंडात गुंतवणूक करताना कमी आणि दिर्घ आशा दोन कालावधी प्रकारात ती केली जाते. आपण केलेली गुंतवणूक फायद्याची की तोट्याची याचा अंदाज काढणे हे जरा जीकरीचेच काम आहे.


फायदा होतोय की तोटा हे लगेच कळत नसल्याने 'एसआयपी'त गुंतवणूक करणाऱ्यांची कायम घालमेल सुरू असते. आर्थिक गुंतवणूक असल्यामुळे गुंतवणूकदार दररोज एका गोष्टीवर नजर ठेऊन असतात, ती म्हणजे ‘पोर्टफोलियो’.


म्यूचुअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांकडून हमखास विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर देताना तज्ञ सांगतात की, “दररोज पोर्टफोलियोवर नजर ठेवल्यानं तुम्हाला काहीच कळणार नाही. उलट ज्या स्कीममध्ये तुम्ही पैसा गुंतवलाय, शेअर मार्केटनुसार त्यात दररोज होणारी चढ-उतार बघून तुमचा जीव अधीकच टांगणीला लागतो.”


यावर उपाय एकच, तो म्हणजे दररोज पोर्टफोलियो पाहण्याऐवजी तुम्ही किमान सहा महिन्यातून एकदा तो पहावा. यामुळे म्यूचुअल फंडात केलेल्या गुंतवणुकीवर लाभ होतोय की नुकसान हे सहज कळेल.


तुमच्या स्कीमच्या पोर्टफोलियोशी निगडित सर्व माहिती ही तिच्या ‘फंड फॅक्टशीट’मध्ये दिलेली असते. जी प्रत्येक महिन्याला म्यूचुअल फंड कंपनीद्वारे जारी केली जाते. ही ‘फंड फॅक्टशीट’ कंपनीच्या वेबसाइटवसुद्धा पाहू शकता. त्यात म्यूचुअल फंड कंपनीने कोण-कोणत्या कंपनीच्या शेयरमध्ये तुमचा पैसा गुंतवलाय याचीसुद्धा तुम्हाला माहिती मिळेल.


तुमच्या गुंतवणूक स्कीमने बेंचमर्कच्या तुलनेत कश्या पद्धतीने गुंतवणूक केली आहे याची माहितीसुद्धा तुम्हाला ‘फॅक्ट शीट’मध्ये पाहता येईल. तसेच, तुम्ही ज्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये गुंतवणूक केलीय तिचा वार्षिक परतावा, तिचं स्टँडर्ड डेव्हिएशन, बीटा आणि शार्प रेशो याची माहितीसुद्धा तुम्हाला मिळेल.


या क्षेत्रातले तज्ञ सुचवतात की, तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडाची तुलना, त्याच वर्गातील अन्य स्कीमशी करायला हवी. उदाहरणार्थ, लार्ज-कॅप फुंडाची तुलना तुम्ही निफ्टीशी किंवा त्याच बरोबरीच्या लार्ज-कॅप फंडाशी करू शकता.