देशभरात कोट्यवधी लोक हे क्रेडिट कार्डचा वापर करतात. याचा वापर समजूतदारपणे केला तर फायदा होतो. मात्र गैरजबाबदारपणे क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. अनेकदा पैशांची चणचण असल्यामुळे क्रेडिट कार्डचं बिल भरायला पैसेच उरत नाही. मग योग्य वेळी बिल न भसल्यास दंडही भरावा लागतो.