अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेटमध्ये यंदा नवीन टॅक्स स्लॅब आणला आहे. मात्र जुना टॅक्स स्लॅब सध्यातरी बंद करणार नाही असे संकेत दिले आहेत. नवीन किंवा जुनी पद्धत निवडण्याचा पर्याय हा नागरिकांवर सोडण्यात आला आहे. तुम्हाला जर नव्या टॅक्स स्लॅबमध्ये शिफ्ट करायचं असेल तर कसं करु शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
टॅक्स बडीचे निर्माते सुजित बांगर म्हणाले की, जर पगारदार कर्मचाऱ्याने कोणत्याही व्यवसायातून उत्पन्न मिळवले तर त्याचे उत्पन्न वेतन आणि PGBP अंतर्गत येईल. शेअर्स, F&O, कमोडिटीज किंवा कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज, फ्रीलान्सिंग, YouTube किंवा इतर मार्गाने पैसे कमवणं याचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे.