दररोज लाखो लोक विमानाने प्रवास करतात. विमानाने प्रवास करताना बिझनेस क्लास आणि इकॉनॉमी क्लास असे दोन तिकीट मिळता. विमानाचे तिकीट बुक करता तेव्हाच तुम्हाला विचारले जाते की तुम्हाला बिझनेस क्लास हवा आहे की इकॉनॉमी क्लास. बिझनेस क्लासपेक्षा इकॉनॉमी क्लास खूपच स्वस्त आहे. कारण त्यात सुविधा फार कमी आहेत. तर बिझनेस क्लास लग्जीरियस असतात. यामध्ये आरामदायी रुंद सीट, पायासाठी भरपूर जागा. सोबत जेवणाची उत्तम व्यवस्था असते. बिझनेस क्लासची तिकिटे बुक करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. पण एका फ्लाईट अटेंडंटने असं सीक्रेट सांगितलंय की, स्वस्त तिकीटातही बिझनेस क्लासमध्ये कसा प्रवास करता येईल. म्हणजे इकॉनॉमी क्लास तिकिटाच्या पैशात तुम्हाला बिझनेस क्लासमध्ये प्रवास करता येणार आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, फ्लाइट अटेंडंट सिएरा मिस्ट @cierra_mistt ने एअरलाइनशी संबंधित काही सीक्रेट शेअर केलीये. तिने सांगितले की, बहुतेक विमान कंपन्या विमानाचे वजन आणि संतुलन राखण्यासाठी सीट बदलतात. जर तुम्हाला बिझनेस क्लासमध्ये प्रवास करायचा असेल तर सर्वात आधी तुम्ही इकॉनॉमी क्लासची मागची सीट निवडावी. जेव्हा जेव्हा विमानात बिझनेस क्लास रिकामा असतो तेव्हा अनेक वेळा बॅलन्स करण्यासाठी इकॉनॉमी क्लासमधून प्रवाशांना घेतले जाते. आधी फक्त मागच्या प्रवाशांना काढले जाते. यालाही कारण आहे. विमानांचा मागील भाग जड असतो कारण बहुतेक इंजिनचे भाग आणि सामान मागील बाजूस असते. त्यामुळे तेथील वजन कमी केले जाते. सहकारी बँका FD वर देताय 9 टक्के व्याज, पण धोके माहितीये का?
चॉकलेट किंवा स्नॅक ऑफर करा : सिएरा मिस्टने सांगितले की, केविन क्रूसोबत चांगला व्यवहार करणं देखील तुम्हाला अशी सुविधा देऊ शकते. बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नसते. परंतु प्रथम श्रेणीचे तिकीट मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे फ्लाइट अटेंडंट आणि गेट एजंटशी चांगले वागणे. चॉकलेट किंवा नाश्ता ऑफर करणाऱ्या प्रवाशांना जागा मिळण्याची शक्यता जास्त असते. एका रिपोर्टनुसार, ही ट्रिक हजारो वेळा कामी आली आहे. केबिन क्रूला समजते की असे काही लोक आहेत जे त्वरीत प्रतिक्रिया देतात आणि क्रूला मदत करू शकतात. यामध्ये अग्निशमन विभाग, पोलीस, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिक्स, सैन्य कर्मचारी किंवा विमान कर्मचारी देखील समाविष्ट असू शकतात. ट्रेनमध्ये 'या' लोकांना मिळू शकते भाड्यामध्ये सूट, जाणून घ्या काय आहेत रेल्वेचे नियम?
या लोकांना पहिले मिळते संधी : फ्लाइट अटेंडंटने सांगितले की, जेव्हाही आपत्कालीन परिस्थिती असेल तेव्हा अशा लोकांकडून त्वरित मदत घेतली जाऊ शकते. ते क्रूच्या अगदी जवळ असतात आणि त्यांना त्वरित मदत करू शकतात. यासाठी तुम्हाला फक्त बोर्डिंग करण्यापूर्वी गेट एजंटला माहिती द्यावी लागेल. गेट एजंट लगेच याची नोंद घेतात आणि संधी मिळताच तुम्हाला बिझनेस क्लासची सीट ऑफर करतात. एखाद्या प्रवाशाने ओव्हरबुक केलेले फ्लाइट सोडल्यास आणि काही तासांनंतर प्रवास करण्यास तयार असल्यास, तरीही कंपन्या फर्स्ट क्लासमध्ये अपग्रेड देतात. PPF अकाउंट बंद झालंय तर नो टेंशन! एका झटक्यात करता येईल सुरु, ही आहे प्रोसेस
या काळात तिकीट बुक करा : सिएरा मिस्टने सर्वात स्वस्त विमान तिकिटे मिळवण्यासाठी एक ट्रिक देखील शेअर केली आहे. सर्वसामान्यांसाठी ही अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे. त्यांच्या मते मंगळवार, बुधवार आणि गुरुवारची तिकिटे काढायची असतील तर तिकीट इतर दिवसांच्या तुलनेत खूपच स्वस्त असेल. कारण या दिवसात विमानाचे भाडे तुलनेने कमी असते. वोटर आयडी आणि आधार कार्ड वापरता ना? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट