हे इंटरनेटचे युग आहे आणि सर्व काही इंटरनेटवर अवलंबून आहे. इंटरनेट थोडे जरी स्लो झाले तर आपली अनेक कामं रखडतात. मात्र आता तुम्हाला इंटरनेटचा चांगला स्पीड मिळू शकतो. कारण टेलीकॉम कंपन्यांनी ब्रॉडबँडची व्याख्या बदलली आहे. आता टेलीकॉम कंपन्यांना ब्रॉडबँडसाठी किमान 2 एमबीपीएस स्पीड द्यावा लागणार आहे. आतापर्यंत 512 केबीपीएस ब्रॉडबँड मानला जात होता.
ब्रॉडबँडचे भारतात सुमारे 85 कोटी ग्राहक आहेत. यापैकी 82.5 कोटी ग्राहक मोबाईलवर ब्रॉडबँड वापरतात. एवढेच नाही तर देशातील अडीच कोटी लोकांकडे लँडलाइन ब्रॉडबँड आहे. आता कंपन्यांना ब्रॉडबँड म्हणवून घेण्यासाटी स्पीड वाढवावा लागेल. आता 2G 3G सेवा ब्रॉडबँडच्या श्रेणीत येणार नसल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.