

बुधवारी सोनंचांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळते आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10 वाजता सोन्याच्या किंमतीत 107 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. यानंतर सोन्याचे दर 49550.00 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. तर चांदी 324 रुपयांनी महागली आहे. यानंतर चांदीचे भाव 65177.00 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होते. मंगळवारी सोन्याचे भाव 49443 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. आज सकाळी सोनं 49566 रुपये प्रति तोळाने उघडलं होतं.


दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत (Gold price in delhi) 514 रुपये प्रति तोळाने वाढ झाली होती. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर दिल्लीमध्ये 48,874 रुपये प्रति तोळा झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या किंमती आणि रुपयामध्ये घसरण यामुळे सोन्याचे दर वाढले होते. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी चांदीचे दर 1,046 रुपये प्रति किलोने वाढले होते. यानंतर चांदीचे भाव प्रति किलो 63,612 रुपये होते.


सोन्याच्या दराने यावर्षी उच्चांक गाठला होता. 57100 रुपये प्रति तोळा या स्तरावर सोनं पोहोचलं होतं, त्या हिशोबाने आता सोन्यामध्ये 7000 रुपयांची घसरण झाली आहे. अमेरिकेत आर्थिक प्रोत्साहन पॅकेजबाबत आशा वाढल्याने सोन्याचांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. एमसीएक्सवर फेब्रुवारीच्या सोन्याची वायदे किंमत 0.26% ने वाढून 49,571 प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीची वायदा किंमत 0.6% ने वाढून 65,230 रुपये प्रति किलो झाली आहे.


खरमासमुळे सोन्या-चांदीच्या किरकोळ मागणीवर पुढील एका महिन्यासाठी परिणाम पाहायला मिळू शकतो. खरमास 14 डिसेंबर ते 14 जानेवारी दरम्यान आहे. या प्रकरणात विवाह किंवा कोणतीही शुभ कार्ये केली जात नाहीत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या काळात लोक खूप क्वचितच सोने-चांदी खरेदी करतील, ज्याचा परिणाम मागणीवर पाहायला मिळतो आहे.