लग्नसराई सुरु झाली आहे. या काळात सोन्या चांदीला प्रचंड मागणी असते. दरम्यान आता सोनं स्वस्त झालंय. ही सोनं खरेदीरासांठी सुवर्ण संधी आहे. बुधवारी वायदा बाजारात सोन्याच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत होते. यानंतर आजही हिच स्थिती आहे. आज सोन्याच्या किंमती या घसरल्या आहेत.
चांदीच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्यातही घसरण सुरुच आहे. चांदी आज पहाटेपासून लाल चिन्हावर व्यवहार करतेय. सकाळी 11.30 वाजता 70,705 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये कालच्या तुलनेत 381 रुपयांनी म्हणजेच 0.54 टक्के घट दिसून येतेय. काल मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच फ्युचर्स मार्केटमध्ये चांदी 71,086 रुपयांवर बंद झाली होती.