भारतीय सराफा बाजारात आज मंगळवारी 23 मे 2023 रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव प्रतिकिलो 71 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
2/ 5
राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 60,450 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 71568 रुपये आहे.
3/ 5
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सोमवारी संध्याकाळी 60829 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज (मंगळवारी) सकाळी 60450 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे सोने-चांदी स्वस्त झाले आहेत.
4/ 5
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी 60,208 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचबरोबर 916 शुद्धतेचे सोने आज 55372 रुपये झाले आहे. तर 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 45338 वर आला आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 71568 रुपये झाला आहे.
5/ 5
सोमवारी 999 शुद्ध सोन्याचा दर 60829 रुपये होता. तर मंगळवारी 60450 रुपये झालाय. म्हणजेच सोनं 379 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदी 72521 दरावर होती. ती 71568 वर आली आहे. म्हणजेच 953 रुपयांनी स्वस्त झाली आहे.