होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


दिवाळीआधीच सोनं महाग होऊ लागलं आहे. सलग तीन दिवस सोन्याच्या किमती वाढत आहेत. गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोनं प्रतितोळा 50,926 रुपये होतं. शुक्रवारी सोनं 51,717 रुपयांवर पोहोचलं आहे. सोनं तब्बल 791 रुपयांनी महागलं आहे.
2/ 5


बुधवारपेक्षा गुरुवारीदेखील सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. बुधवारी सोन्याचे दर 50,822 रुपये प्रति तोळावर ट्रेड करणं बंद झाले होते. गुरुवारी हा दर 50,926 रुपयांवर पोहोचला.
3/ 5


सोन्यासह चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळते आहे. चांदीचे आज 2 हजार रुपये प्रति किलोग्रामनं महाग झाली आहे. चांदीचे आजचे दर 2,147 रुपयांनी वाढून 64,578 रुपये प्रति किलोग्राम पोहोचली आहे. गुरुवारी चांदी 62,431 रुपये होती.