Gold Price Today: आज म्हणजेच 14 मार्च रोजी तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळतेय. आज तुम्हाला स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे. तसंच चांदीच्या दरात आज वाढ होताना दिसतेय. चला तर मग जाणून घेऊया सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट काय आहेत.
या महिन्याच्या अखेरीपासून देशात लग्नसराई सुरू होणार आहे. लग्नाच्या मोसमात सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. या काळात सोन्याच्या चेनपासून ते अंगठ्या आणि इतर अनेक प्रकारच्या दागिन्यांची मागणी वाढते. अशा स्थितीत लग्नसराईचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सोने स्वस्त झाले तर खरेदीदारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात घट दिसून येतेय. आज MCX वर सोनं 57483.00 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडले. दुपारी 12 च्या सुमारास, MCX वर सोने 69.00 रुपयांनी म्हणजेच 0.12% ने कमी होऊन 57573.00 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करतेय. गेल्या दिवशी सोन्याचा भाव 57642.00 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. सोनं खरेदी करताना राहा सावधान! सरकारने जारी केले नवे नियम
चांदीचा भाव किती? : आज चांदी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये 66411.00 रुपये प्रति किलोच्या स्तरावर उघडली. त्याच वेळी, दुपारी 12 च्या सुमारास चांदीचा भाव 87.00 रुपयांनी म्हणजेच 0.13 टक्क्यांनी वाढून 66739.00 रुपये प्रति किलो झालाय. चांदीचा कालचा बंद भाव 66652.00 रुपये प्रति किलो आहे. सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतार कायम राहतील, असा अंदाज आहे. गोल्ड लोन घेण्याचा प्लान करताय? या 10 बँका ऑफर करताय सर्वात कमी व्याज