आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होतेय. तरीही देशांतर्गत बाजारात त्याचा परिणाम दिसून येत नाही. शुक्रवार, 24 मार्च 2023 रोजी सोन्याच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,490 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडला. त्यानंतर त्यात घसरण दिसून येत असून 12.30 मिनिटांनी तो 59,275 रुपयांवर पोहोचलंय.