Gold Price Today: 3 दिवसात 2000 रुपयांनी उतरलं सोनं, येणाऱ्या काळात आणखी घसरणीचे संकेत
Gold Silver Price : सोनंचांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचांदीच्या किंमती उतरल्या आहे. तज्ज्ञांच्या मते हे दर आणखी कमी होऊ शकतात.


3 दिवसात 2000 रुपयांनी कमी झाले दर- गेल्या दोन दिवसांत सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचांदीचे दर कमी झाले आहेत. MCX वर सोन्याची वायदे किंमत 0.21 टक्क्यांनी कमी होऊन 48,485 रुपये प्रति तोळा तर चांदी 0.16 टक्क्याने कमी होऊन 59,460 रुपये प्रति किलो झाली आहे. आधीच्या सत्रात सोन्याची वायदा किंमत 900 रुपये तर चांदीची वायदा किंमत 1600 रुपयांनी कमी झाली होती


आणखी कमी होतील सोन्याचे दर- ब्रोकरेज फर्म एंजल ब्रोकिंगचे डेप्यूटी व्हीपी अनुज गुप्ता यांच्या मते या महिन्यात गोल्ड ईटीएफच्या होल्डिंगमध्ये 10 लाख औंसची घसरण झाली आहे. याचा अर्थ असा की गुंतवणूकदार हळूहळू सोन्यावरून होल्डिंग कमी करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याचे दर कमी होऊ शकतात.


का कमी होत आहेत सोन्या-चांदीचे दर- एचडीएफसी सिक्योरिटीजचे कमोडिटी अनालिस्ट तपन पटेल (HDFC Securities Senior, Analyst (Commodities) Tapan Patel) आणि मोतीलाल ओसवालचे वीपी रिसर्च नवनीत दमानी यांच्या मते कोरोना लशीसंदर्भात समोर आलेल्या बातम्यामुळे सोन्याचांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. या काळात सोन्याबाबत सुरक्षित गुंतवणुकीची मागणी घटली आहे.


सोन्याचे दर गेल्या चार महिन्यातील निचांकी स्तरावर- आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे किरकोळ वाढले आहेत. सोन्याचे दर गेल्या चार महिन्यातील निचांकी स्तराच्या जवळपास आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्याने वाढून 1,809.41 डॉलर प्रति औंस झाले आहेत. कमजोर डॉलरमुळे सोन्याला सपोर्ट मिळाला आहे.