चीनबरोबरच्या वाढत्या तणावामुळे सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. चीन सीमेवरच्या तणावाचा परिणाम शेअर बाजारावरसुद्धा दिसला. एकाच दिवसात सेन्सेक्स 839 अंकांनी पडला. शेअर बाजाराच्या पडझडीचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे. आज सोन्या चांदीचे भाव पुन्हा गगनाला भिडत चाललेले दिसले. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी दिल्लीच्या सराफा बाजारात 161 रुपयांनी सोनं वाढलं आणि चांदी किलोमागे 800 रुपयांनी वधारली. सोमवारी सोन्याचा दर 52638 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला. चांदीची किंमतही किलोला 68,095 रुपये एवढी झाली.