उद्या गुढीपाडवा आहे, या दिवशी सोनं खरेदीला महत्त्व आहे. मात्र असं असताना सोनं मात्र भाव खाताना दिसतंय. दोन-तीन दिवसांपासून सोनंच्या किंमतीत तेजी आल्याचं दिसतंय. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी आज सोन्याच्या दरात सातत्याने उसळी सुरू आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे.गोल्ड लोन घेण्याचा प्लान करताय? या 10 बँका ऑफर करताय सर्वात कमी व्याज
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन 21 मार्च 2023 रोजी सकाळी सोने महाग झाले आणि चांदी स्वस्त झाली. सोन्याचा भाव 59 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. आता सोनं आणायला दुबईत जावं लागतंय वाटतं, पाहा किती स्वस्त?
चांदीची किंमत 68 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59,487 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 68,409 रुपये आहे. लग्नासाठी सहज काढता येईल EPFO चा पैसा, फक्त लक्षात ठेवा 'या' अटी
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज सकाळी 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत ५९२४९ रुपये झाली आहे. त्याचबरोबर 916 शुद्धतेचे सोने आज 54490 रुपये झालेय. याशिवाय 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 44615 वर आलाय. तर 585 शुद्धतेचे सोने महाग होऊन आज 34,800 रुपयांवर पोहोचलेय. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 68409 रुपये झाला आहे. गुढीपाडव्यालाच का खरेदी करतात सर्वात जास्त सोनं?