अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रेट्सबरोबर आर्थिक प्रोत्साहन पॅकेज संदर्भातील वार्ता स्थगित केल्यानंतर भारतात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळते आहे. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात एमसीएक्सवर डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत 470 रुपये किंवा 0.9 टक्क्यांनी उतरली. या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रति तोळा 50,088 रुपयांवर पोहोचले आहेत.
जगभरातील सर्वात मोठा गोल्ड-एक्सचेंज एक्सचेंज ट्रेडेड फंड अर्थात ईटीएफमध्ये एसपीडीआर गोल्ड ट्रस्टची होल्डिंग मंगळवारी 0.32 टक्क्यांनी घसरून 1,271.52 टन राहिली आहे. अनालिस्टच्या मते अमेरिकन डॉलरचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे. फेस्टीव्ह सीझनमध्ये सोन्याची मागणी भारतात वाढेल, असे मत या विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.