सुवर्णसंधी! आणखी स्वस्त झालं सोनं; पटापट तपासा आजची Gold Price
Gold and Silver Price Today : गेल्या 10 महिन्यांत सोनं जवळपास 11500 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
|
1/ 7
गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या (Gold-Silver) दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळते आहे. गुरुवारीदेखील सोनं आणखी घसरलं Gold Price Today आहे.
2/ 7
दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोनं प्रतितोळा 44,372 झालं आहे. बुधवारी सोनं 44,589 होतं. म्हणजे तब्बल 217 रुपयांची घट झाली आहे. बुधवारी सोनं 208 रुपयांनी कमी झालं होतं.
3/ 7
चांदीचा दरही घसरला आहे. बुधवारी चांदी प्रति किलो 67,815 रुपयांवरून घसरून 66,598 आलं आहे. बुधवारी चांदीचा दर 602 रुपयांनी वाढला होता. पण आज पुन्हा कमी झाला आहे.
4/ 7
गेल्या 10 महिन्यांत सोनं जवळपास 11500 रुपयांनी स्वस्त झालं आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपयांवर पोहोचलं होतं जे आता 45000 च्याही खाली आलं आहे.
5/ 7
एकिकडे शेअर बाजारात तेजीत आहे, तर दुसरीकडे सोन्याच्या किमती घटत आहेत. त्यामुळे गुंतवणूक कुठे करावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सोनं उत्तम पर्याय असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सोन्याच गुंतवणूक करा.
6/ 7
इंटरनॅशनल अँड कमोडिटी अँड कॅपिटल अॅडव्हायझर क्षितिज पुरोहित यांनी सांगितलं, सोनं आता साइडवे ट्रेंड करतं आहे. म्हणजे याच्या किमतीत फार बदल होणार नाहीत आणि एमसीएक्स गोल्ड 45600-45800 स्तरावरच राहिल.
7/ 7
तर केडिया एडव्हायझरीचे एमडी अजय केडिया यांनी सांगितलं सोनं 44,500-45000 रुपयांदरम्यान आहे. याचा अर्थ याची किंमत 45 हजार रुपयांपेक्षा खाली येण्याची शक्यता नाही. शॉर्ट टर्मसाठी सोनं याच रेंजमध्ये राहिल किंवा यापेक्षा अधिक वाढेल.