फोर्ब्सनं जगभरातल्या सर्वोत्तम बँकांची यादी पुढे आणलीय. यात 23 देशांच्या बँकांचा समावेश आहे. भारतातल्या 10 बँकांना या यादीत स्थान मिळालंय. दहाव्या स्थानावर आहे खासगी क्षेत्रातली एक्सिस बँक. नवव्या स्थानावर आहे विजया बँक. या बँकेत एकूण 16, 079 कर्मचारी आहेत. आठवं स्थान पटकावलंय इलाहाबाद बँकेनं. यात 23967 कर्मचारी आहेत. सातव्या स्थानावर आहे पंजाब नॅशनल बँक. या बँकेचं मुख्य आॅफिस दिल्लीत आहे. बँकेत 74,897 कर्मचारी आहेत. सहाव्या नंबरवर आहे सिंडिकेट बँक. मुख्य आॅफिस आहे कर्नाटकमध्ये. बँकेत 34,989 कर्मचारी आहेत. IDFCनं पाचवं स्थान पटकावलं. बँकेचं मुख्य आॅफिस चेन्नईत आहे आणि बँकेत 9,670 कर्मचारी आहेत. कोटक महेंद्रा बँक चौथ्या स्थानावर आहे. मुख्य आॅफिस मुंबईत आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे 35,717 . DBS बँकेनं तिसरा नंबर मिळवला. बँकेचं आॅफिस सिंगापूरला आहे. बँकेत 24,174कर्मचारी आहेत. सर्वात मोठी खासगी बँक ICICI दुसऱ्या नंबरवर आहे. बँकेत 81,548 कर्मचारी आहे. मुख्य आॅफिस मुंबईत आहे. सर्वात टाॅपवर आहे HDFC बँक. त्यात 88,253 कर्मचारी आहेत. देशातली सर्वात मोठी बँक SBI टाॅप 10मधून बाहेर पडलीय. ती 11वी आहे.