नवीन आर्थिक वर्ष 2023-24 आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी विशेष ठेव योजनेची घोषणा केली होती, आता महिला त्याचा लाभ घेऊ शकतात. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेबाबत वित्त मंत्रालयाने राजपत्र अधिसूचना जारी केली आहे.
जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या अकाउंटमध्ये किमान 1,000 रुपये ते कमाल 2 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. यासोबतच, या योजनेत खातेदार हा सिंगल अकाउंट होल्डर असावा. योजनेतील गुंतवणूकदारांना वार्षिक 7.5 टक्के व्याज दिले जाईल आणि व्याजाची रक्कम प्रत्येक तिमाहीनंतर खात्यात ट्रान्सफर केली जाईल.