22 कॅरेट सोने (The 22k gold)- 22 कॅरेट सोन्यामध्ये 22 भाग सोने असते आणि त्यातील दोन भाग इतर कोणत्याही धातूंचे मिश्रण असते. इतर धातूंबद्दल बोलायचे तर त्यात जस्त आणि तांबे असू शकतात. 22 कॅरेट सोने 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यापेक्षा कठीण असते. कारण त्यात इतर धातू मिश्रीत असतात. 22 कॅरेट सोने दागिन्यांसाठी चांगले मानले जाते. 22 कॅरेट सोन्याला '916 Gold' असेही म्हणतात कारण त्यात 91.62 टक्के शुद्ध सोने असते.