कोरोनाव्हायरचे (Coronavirus Crisis) युरोपियन देशांतील वाढत्या संक्रमणामुळे पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, जगभरात मागणी कमी होण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किंमतींवर दबाव वाढला आहे. तसेच कच्च्या तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांकडून क्रूडचा पुरवठा निरंतर वाढविला जात आहे.
पाण्यापेक्षा कच्चे तेल कसे स्वस्त झाले- सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 37 डॉलर आहे. एका बॅरलमध्ये 159 लिटर तेल असते. सध्या एका डॉलरची किंमत 74 रुपये आहे. याचा अर्थ एका बॅरलची किंमत 2733 रुपये आहे. तर, एक लीटरमध्ये त्याची किंमत 17.18 रुपयांच्या जवळ येते. देशात पाण्याच्या बाटलीची किंमत 20 रुपयांच्या जवळ आहे.
कच्चे तेल हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी किती वरदान ठरेल - भारत सरकारने या काळात कमी किंमतीत कच्चे तेल विकत घेतले असेल, पण पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे प्रमाण फारसे बदललेले नाही. यामुळे सरकारला दोन मोठे फायदे झाले. सर्व देशातील चालू खात्यातील तूट (CAD) कमी झाली आणि दुसरे म्हणजे सरकारचे उत्पन्न वाढले. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, आणखी एक चांगली घटना नुकतीच घडली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सुधारला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया हळूहळू 77 वरून 74 पर्यंत सुधारला.