सध्याच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर वाढलाय. बहुतेक लोक त्यांचा खर्च मॅनेज करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरतात. यामुळे पेमेंट करणं सोपं होतं आणि लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढते. अनेक वेळा लोक क्रेडिट कार्डद्वारे त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त पैसे देतात आणि नंतर पूर्ण बिल वेळेवर भरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर क्रेडिट कार्डच्या कर्जाचा बोजा वाढतो आणि त्यांना बिलासह भरमसाट व्याज द्यावे लागते.
क्रेडिट कार्डद्वारे EMI वर काहीही खरेदी करणं खूप सोपं आहे. यामध्ये, EMI थेट पद्धतीने ऑपरेट होतो. तुम्ही एका लिमिटपेक्षा जास्त ट्रांझेक्शन EMI मध्ये सहजपणे रूपांतरित करू शकता. क्रेडिट कार्डने खरेदी करता तेव्हा त्याची EMI करताना नेहमी नो-कॉस्ट EMI चा ऑप्शन निवडा. ज्या EMI प्लॅनमध्ये व्याज द्यावे लागेल, ते निवडणे टाळा.
बरेचदा लोक क्रेडिट कार्डचे बिल जारी केल्यानंतर ते भरण्यासाठी पैसे गोळा करू लागतात. परंतु तुम्हाला बिल भरण्यासाठी ड्यू डेटची वाट पाहण्याची गरज नाही. महिन्याभरात तुमच्याकडे पैसे उपलब्ध असतील तेव्हा क्रेडिट कार्डचे बिल भरा. यानंतर जेव्हा गरज असेल तेव्हा त्याच माध्यमातून पेमेंट करा. यामुळे तुमचे बिल नेहमी वेळेवर भरले जाईल. तसंच प्री-पेमेंटसह तुमचा क्रेडिट स्कोअर देखील चांगला राहील.
तुम्ही दरमहा जितके पैसे कमावता त्यापेक्षा तुमचा खर्च नेहमी कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. व्याज आणि कर्जाचा बोजा टाळण्यासाठी कर्ज घेऊन खर्च करण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवायला शिका. तुमच्याकडे 2-3 क्रेडिट कार्ड असतील. त्यांची लिमिट लाखात असू शकते, पण जिथे पैसे खर्च न करता किंवा कमी पैशात तुमचे काम करता येईल तिथे खर्च करणं टाळा. अशा प्रकारे, तुम्ही क्रेडिट कार्ड बिलावरील व्याजापासून मुक्त होऊ शकता.