मुंबई : लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. त्याच दरम्यान चैत्र नवरात्रही सुरू आहे. अक्षय तृतीया तोंडावर आली आहे. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी देखील वाढू शकते. त्यामुळे सोन्याच्या किंमती आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
2/ 8
गेल्या तीन दिवसांपासून सोन्याचे दर वाढले आहेत. एवढंच नाही तर आता चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर 69 हजारवर पोहोचले आहेत.
3/ 8
२४ कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी ६० हजार रुपये मोजावे लागत आहेत. शुक्रवारी 59,780 रुपये दर होता. आता २२० रुपयांनी सोनं वाढलं आहे.
4/ 8
24 कॅरेट 8 ग्रॅम सोन्यासाठी आज 48,000 रुपये मोजावे लागणार आहेत. शुक्रवारी हेच दर 47,824 रुपयांवर होते. यामध्ये 176 रुपयांनी वाढ झाली आहे.
5/ 8
२२ कॅरेट सोन्याचे दर 55,000 वर पोहोचले आहेत. तर 1 ग्रॅम सोन्यासाठी 5,500 रुपये मोजावे लागत आहेत.
6/ 8
भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो.
7/ 8
यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आकारून त्याची विक्री करतो.
8/ 8
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.