Car Loan:आजच्या जगात कार ही लक्झरी नाही तर गरज बनली आहे. मात्र तुमचा पगार पाहून तुम्ही आपल्याला कार लोन मिळेल की नाही असा विचार करता ना? आज आपण किती पगारावर कार लोन मिळू शकतं याविषयी जाणून घेणार आहोत.
2/ 5
कार लोन घेण्यासाठी मिनिमम सॅलरी18000 असल्यास तुम्ही कार लोन घेऊ शकता. कार लोनसाठी किमान व्याज दर 9.25% आहे आणि प्रत्येक बँक आणि प्रत्येक प्रकरणात बदलतो. नवीन कार खरेदी करता येत नसेल तर कर्ज घेऊनही जुनी कार खरेदी करता येते.
3/ 5
कार लोन घेण्यासाठी वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत कार लोन घेता येईल. कर्जाची रक्कम कारची किंमत आणि तुमच्या पगारावर अवलंबून असते.
4/ 5
नोकरी करणाऱ्यांसोबतच स्वत:चे काम करणाऱ्यांनाही कार लोन घेता येईल. मात्र, कार लोन घेण्यासाठी किमान 2 वर्षांचा इन्कम टॅक्स रिटर्न आवश्यक आहे.
5/ 5
कार लोनसाठी किमान CIBIL स्कोअर 700 असावा. साधारणपणे, कमी CIBIL स्कोअर असलेल्यांना बँका कार कर्ज देत नाहीत. बँका एकूण खर्चाच्या 80 टक्के कर्ज देतात. परंतु काही प्रकरणांमध्ये 90 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाऊ शकते.