शौक महाग पडणार! सिगरेटच्या एका 'कश'साठी मोजावे लागणार जास्त पैसे
गेल्या दोन वर्षांपासून सिगारेटच्या शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सिगारेटच्या आकारानुसार २१२ टक्क्यांवरून ३८८ टक्क्यांपर्यंत हा शुल्क वाढवण्यात आलं आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये सिगारेटवरील कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता सिगारेट महाग होणार आहे. सिगारेट ओढणाऱ्यांच्या खिशाला त्यामुळे चांगलीच कात्री लागणार आहे.
2/ 5
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये सिगारेटवरील राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक शुल्क (National Calamity Contingent Duty) 16 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. याचा स्पष्ट अर्थ सिगारेट महागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
3/ 5
गेल्या दोन वर्षांपासून सिगारेटच्या शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सिगारेटच्या आकारानुसार २१२ टक्क्यांवरून ३८८ टक्क्यांपर्यंत हा शुल्क वाढवण्यात आलं आहे.
4/ 5
त्यामुळे कमी किमतीच्या पॅकसाठी सिगारेटच्या किंमतीत ६ ते ७ टक्के आणि प्रीमियम पॅकसाठी ४ ते ५ टक्के वाढ होणार आहे. त्यावेळी सर्वात मोठी सिगारेट उत्पादक कंपनी आयटीसीने आपल्या सर्व ब्रँडच्या किमती तब्बल १० ते २० टक्क्यांनी वाढवल्या होत्या.
5/ 5
तंबाखूवर GST लावला जातो. याशिवाय पान मसाला, सिगारेटवर NCCD माध्यमातून सीमा शुल्क लावलं जातं. ते सिगारेटच्या आकारावरून ठरवण्यात येतं किती शुल्क लावायचं आहे. यामध्ये 16 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे सिगारेट महाग होणार आहे.