World of Statisticsने आपल्या ट्विटर हँडलवर आतापर्यंत सर्वाधिक विकल्या गेलेल्या मोबाईल फोनची यादी जाहीर केलीये. या यादीत सर्वात वर Nokia 1100 चं नाव आहे. त्याची जास्तीत जास्त 250 मिलियन युनिट्स म्हणजेच सुमारे 25 कोटी मॉडेल्स जगभरात विकली गेली आहेत. हा फोन भारतात 2003 मध्ये लॉन्च झाला होता. या यादीत दुसरे नाव नोकिया 1110 चे आहे. त्याची 248 मिलियन यूनिट्स विकली गेली आहेत.