

प्लॅस्टिक मनीच्या जमान्यात ATM कार्ड वापरणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पण कार्ड वापरताना केलेली जराशी चूकसुद्धा महागात पडू शकते.


शॉपिंग करताना ATM कार्ड स्वाइप करताना कार्ड इन्फर्मेशनची चोरी होऊ शकते. आजकाल कार्ड क्लोनिंक करून तुमची खासगी माहिती चोरली जाऊ शकते आणि मग सुरक्षितपणे कार्ड कसं वापरायचं?


सायबर क्राईमचा डेटा सांगतो की स्किमिंग, क्लोनिंग, फिशिंग अशा पद्धतीचे सर्वाधिक गुन्हा होतात हॉटेल आणि पेट्रोल पंपवर. जेवणाचं बिल देण्यासाठी कार्ड स्वाईप करता तेव्हा ही माहिती चोरली जाते. बऱ्याचदा मेडिकल स्टोरमध्येही कार्ड स्किमिंग होऊन डेटा लीक होऊ शकतो.


कार्ड क्लोनिंग म्हणजे तुमच्या कार्डसारखंच तंतोतंत खोटं कार्ड बनवलं जातं. पेट्रोल भरल्यानंतर स्वाईप करताना किंवा हॉटेलमध्ये असं होऊ शकतं. तुम्ही स्वाईप केलंत की लगेच तुमची माहिती त्यांच्या लॅपटॉप किंवा सिस्टीमवर जाते.


असे गुन्हे करणाऱ्यांकडे अनेक प्रकारची कार्ड स्किमर डिव्हाइस वापरतात. कार्ड स्वाईप करताना त्यावरच्या मॅग्नेटिक स्ट्रिपवरून ही माहिती त्यांना समजते. मग त्यावरून बनावट ATM कार्ड बनवलं जातं.


मग ATM पिनसारखी सिक्रेट इन्फॉर्मेशन विचारण्यासाठी बँकेच्या नावाने खोटा ई मेल पाठवला जातो किंवा फर्जी कॉल केला जातो.


अशा पद्धतीने ग्राहकांना जाळ्यात ओढळण्याचे प्रयत्न केले जातात. म्हणून बँक कधीही सिक्रेट इन्फॉर्मेशन मागत नाही, हे लक्षात ठेवा.


एटीएममधून पैसे काढत असताना हे लक्षात ठेवा : स्वाइप करताना आजूबाजूला हात लावून पाहा. स्कीमर मशिन आजूबाजूला नाही ना याकडे लक्ष ठेवा. स्कीमरचं डिझाईन साधारणतः एखाद्या मशीनच्या पार्टसारखं दिसतं.


एटीएम मशीनचं कीपॅड दाबलं की, स्कीमर असेल तर एक कोपरा दाबला जाईल. त्याकडे लक्ष ठेवा आणि दक्ष राहा.


सुरक्षितपणे एटीएम कार्ड वापरण्याची सोपी पद्धत म्हणजे तुमच्या कार्डचा पिन नंबर सतत बदलत राहा आणि तो कोणाबरोबरही शेअर करू नका.