

जीवन विमा (Life Insurance) सुरक्षित भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर एखाद्या दुर्घटनेला तुम्हाला सामोरे जावे लागले की किंवा मृत्यूची घटना घडली तर अशावेळी विमा पॉलिसी (Life Insurance Policy) तुमच्या कुटुंबाचा सहारा बनते. जर तुम्ही एकटेच तुमच्या कुटुंबासाठी कमावत असाल तक जीवन विमा पॉलिसी काढणे आवश्यक आहे. जाणून घ्या LIC च्या 5 बेस्ट विमा पॉलिसी कोणत्या आहेत.


टेक टर्म प्लॅन- LIC चा टेक टर्म प्लॅन एक ऑनलाइन विमा पॉलिसी आहे. जी ऑफलाइन पॉलिसीपेक्षा स्वस्त आहे. ही एक नॉन-लिंक्ड, विदआउट प्रॉफिट प्योअर प्रोटेक्शन ऑनलाइन टर्म पॉलिसी आहे. या पॉलिसीचा कालावधी 10 ते 40 वर्षापर्यंत असून ही पॉलिसी 18 ते 65 वयोगटातील व्यक्ती खरेदी करू शकतात. यामध्ये लाइफ कव्हरची रक्कम 50 लाख रुपये आहे. ही एक नॉन-मेडिकल स्कीम आहे. LIC च्या वेबसाइटवरून थेट या पॉलिसीसाठी अर्ज करता येईल. आवश्यक माहिती भरून तुम्हाला पेमेंट करता येईल. या पॉलिसीचे डॉक्यूमेंट थेट तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल,


न्यू जीवन आनंद स्कीम- LIC च्या काही पॉलिसी तुम्हाला जीवन सुरक्षा प्रदान करतात. यामध्ये तुम्हाला बोनस देखील मिळती आणि पॉलिसी कालावधीनंतर रिस्क कव्हर देखील जारी राहतो. 18 ते 50 वर्षाच्या व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकतात. यामध्ये कमीत कमी 1 लाखाचा सम अश्योर्ड आवश्यक आहे, यापेक्षा जास्त सम अश्योर्ड देखील तुम्ही घेऊ शकता. या पॉलिसीचा कालावधी 15 ते 35 वर्षाचा आहे. ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने ही पॉलिसी घेता येईल. ही पॉलिसी घेतल्यानंतर 3 वर्षानंतर तुम्ही पॉलिसीमार्फत कर्ज घेण्यासही पात्र व्हाल


जीवन अमर- LIC ची ही पॉलिसी एक प्योअर टर्म पॉलिसी आहे. यामध्ये लाइफ कव्हर निवडण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक लेव्हल इन्शूर्ड आणि दुसरा इन्क्रिसिंग इन्शूर्ड. वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत लाइफ कव्हर उपलब्ध आहे. पॉलिसी दरम्यान धारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते. हे एक ऑफलाइन विमा पॉलिसी आहे. केवळ 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकच ही पॉलिसी घेऊ शकतात. विम्याची किमान रक्कम 25 लाख रुपये आणि रक्कमेची जास्तीत जास्त मर्यादा नाही आहे. या पॉलिसीची मुदत 18 ते 40 वर्षे आहे


जीवन उमंग पॉलिसीः ही एलआयसीची जीवन विमा योजना आहे. याला भागीदारी योजना देखील म्हटले जाते कारण त्याला अंतिम अॅडिशनल बोनस देखील मिळतो. यामध्ये प्रीमियम पेमेंट कालावधीनंतर विमाराशीच्या 8% रक्कम आजीवन किंवा 100 वर्षे वयापर्यंत दिले जाते. यासह प्रीमियम, डेथ बेनिफिट आणि मॅच्युरिटी बेनिफिटवरही टॅक्स बेनिफिट उपलब्ध आहे. निवृत्तीवेतनाधारकांसाठी ही एक उत्तम योजना आहे. यामध्ये भरलेला प्रीमियमवर आयकर कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते. या पॉलिसीमध्ये कर्जाची सुविधा देखील आहे. यामध्ये पॉलिसीची मुदत संपेपर्यंत जोखीम कव्हरेज असते.