

बरेच लोक सौंदर्य वाढविण्यासाठी शरीराच्या काही भागांवर प्लास्टिक सर्जरी करतात. परंतु काहीवेळा या प्लास्टिक सर्जरीचा उलट त्रास सुरू होते. यामध्ये अनेकदा उलट्या होणं किंवा चेहरा पूर्वीपेक्षा अधिक वाईट दिसणं यांसारखे परिणाम दिसता. मेक्सिकोमध्ये एका इंस्टाग्राम मॉडेलची प्लास्टिक सर्जरी इतकी भीषण ठरली की तिचा यामध्ये मृत्यू झाला.


30 वर्षीय जॉसलीन कॅनोला मेक्सिकोची किम कार्दशियन म्हणून देखील ओळखले जाते. कॅनो मॉडेलबरोबर एक स्विमूसूट डिझायनरही होती. इंस्टाग्रामवर कॅनोचे सुमारे 13 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, जे तिच्या सुंदर सौदर्याचे चाहते आहेत.


कॅनोच्या कुटूंबाकडून अद्याप मृत्यूची पुष्टी झालेली नाही, परंतु तिची सहयोगी मॉडेल लीरा मार्सरने ट्विटरवरुन या दुखद घटनेची माहिती दिली. मार्सरने लिहिलं की, 'जॉसलीन कॅनो हिचं कोलंबियामध्ये शस्त्रक्रियेदरम्यान निधन झालं, हे धोकादायक आहे. ती आधीच खूप सुंदर होती. मी तिच्या कुटुंबासाठी प्रार्थना करते, ती खूप गोड होती.


चाहत्यांनी दावा केला आहे की, त्यांना यूट्यूबवर कॅनोच्या अंत्यसंस्काराचे फुटेज सापडले आहेत, जे तिच्या घराजवळील स्मशानभूमीने अपलोड केले होते. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिले आहे की, 'जॉसलीन जन्म 14 मार्च 1990 रोजी झाला आणि तिने 7 डिसेंबर 2020 रोजी मृत्यू झाला.'


कॅनोच्या कुटूंबाकडून किंवा जवळच्या नातेवाईकांकडून याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु तिचे इंस्टाग्राम पेज 7 डिसेंबरपासून अपडेट झालेले नाही. 7 डिसेंबर रोजी कॅनोचं निधन झालं.


कॅनोच्या चाहत्यांना तिच्या अकस्मात मृत्यूबद्दल वाईट वाटत आहे आणि अशा प्रकारच्या धोकादायक प्लास्टिक शस्त्रक्रियेची गरज काय ..असा सवाल उपस्थित केला जात आहे.