मे महिना महाराष्ट्रातील सर्वच भागाला उष्णतेचे चटके देत आाहे. वर्धा जिल्ह्यातही पारा चाळीशी पार गेलाय. वर्ध्यात वातावरणात उष्णता आणि प्रचंड उकाडा आहे. त्यामुळे नागिक हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे मानवी वस्तीकडे वन्य प्राण्यांची धाव दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. काल 22 मे रोजी वर्ध्यातील किमान तापमान 28℃ तर कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. आज 23 मे रोजी किमान तापमान 28℃ तर कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. वातावरण अधिक उष्ण असल्याने उष्माघाताचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हात बाहेर पडणे टाळावे. आरोग्याच्या दृष्टीने सावधानता बाळगावी. पाणी भरपूर प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.