वर्ध्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील तापमान 43 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले असून नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात काल 19 मे रोजी किमान तापमान 28 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. आज 20 मे रोजी वर्धा जिल्ह्यात किमान तापमान 28 तर कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. वाढत्या तापमानामुळे वर्धेकरांनी नागरिक हैराण झाले आहेत. उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. सर्वांनी शक्यतो सावलीतच राहण्याचा प्रयत्न करावा. उष्ण तापमानात दिवसभर भरपूर पाणी प्यावे. बेलाचे सरबत सेवन करावे, बेल उन्हाळ्यामध्ये आरोग्यास अत्यंत गुणकारी आहे. छत्री घेऊन किंवा दुपट्टा बांधून आणि टोपी घालूनच घराबाहेर पडावे.