वर्धा जिल्ह्यात आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. रब्बी हंगामातील हरभरा, गहु पीके काढणीला आली असून उन्हाळी पिकेही धोक्यात आली आहेत.
2/ 10
हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी विजेच्या गडगडाटसह सोसाट्याचा वादळी वारा आला.
3/ 10
वारा आणि अवकाळी पावसाने परिसरातील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
4/ 10
मृग बहाराचा संत्रा तोडणीला आला आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांची संत्रा बाग विकली नाही. वादळी वाऱ्याने संत्रा जमीनदोस्त झाला आहे.
5/ 10
वादळी वाऱ्यामुळे संत्रा उत्पादकांना फटका बसला आहे. झाडांवरील संत्रा गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला.
6/ 10
अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा आणि भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.
7/ 10
सध्या शेतकऱ्यांच्या शेतात गहू आणि हरभरा निघण्याच्या तयारीत आहे. अशात आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात गव्हाचे नुकसान झाले.
8/ 10
शेतकऱ्यांनी हरभऱ्याची कापणी करून गंजी लावली होती. पण, अचानक आलेल्या पावसामुळे हरभऱ्याची गंजी ओली झाली असून नुकसान झाले आहे.
9/ 10
कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या घरातच कापूस पडून आहे. अशातच इतर पिकांना अवकाळीचा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे.
10/ 10
वादळी वारा आणि अवाकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.