शेतकरी पारंपरिक शेती सोडून विविध प्रयोग आपल्या शेतीमध्ये करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळत आहे.
2/ 12
अमरावतीतील अंजनगाव सुर्जी तालुक्यात शेतकरी औषधी वनस्पतींची शेती करतात. कोडगाव येथील शेतकऱ्यांनी पिंपळी या औषधी वनस्पतीची शेती केली आहे.
3/ 12
पिंपळीची लागवड जानेवारी ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करतात. स्थानिक वेलीचाच उपयोग नविन लागवडीसाठी करतात.
4/ 12
पिंपळी पिकाचे 1 लाख 8 हजार बेणे प्रती हेक्टरी लागते. त्यासाठी एक हेक्टर क्षेत्रामध्ये साधारणतः 3 हजार वाफे तयार केले जातात.
5/ 12
पिंपळीच्या वेलांना आधार म्हणून हेटा किंवा पांगरा याची लागवड करतात. वेल वाढण्यास सुरवात झाल्यानंतर वेलीला आधारासाठी लव्हा गवताने किंवा प्लास्टीक दोरीने पांगरा किंवा हेट्यास बांधले जाते.
6/ 12
पिंपळी फळांचे वाळवून 7 ते 10 क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन मिळते. पिंपळीला मागणीनुसार 250 ते 700 रु. प्रती किलो भाव मिळतो.
7/ 12
पिंपळीची बाजारपेठ दिल्ली, निमच, मुंबई येथील औषधी वनस्पतीच्या मंड्या आहेत. पिंपळीचा उत्पादन खर्च कमी असून उत्पन्न चांगले मिळते.
8/ 12
पिंपळी ही बहुवर्षीय बहुगुणीयुक्त वेलवर्गीय वनस्पती आहे. मसाले पदार्थात सुध्दा याचा उपयोग कमी प्रमाणात केला जातो.
9/ 12
पिंपळीचे शास्त्रीय नाव पेपर लॉगम असून ही वनस्पती 'पिपरेसी' वनस्पती कुटुंबातील आहे. या पिकाचा विस्तार भारता व्यतीरिक्त दक्षिण पूर्व आशियात आढळतो.
10/ 12
इंग्रजी भाषेत या पिकास लॉंग पेपर या नावाने संबोधले जाते. तर पिंपळी, पान पिंपळी, छोटी पिप्पल, पिप्पल, टिपली, मगधी ही भारतीय नावे आहेत.
11/ 12
पिंपळी या औषधी वनस्पतीचा उपयोग मानवीय तसेच पशुच्या आयुर्वेदिक, युनानी, तिबेटीयन व लोक औषधात केला जातो.
12/ 12
महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, आसाम, बंगाल व उत्तरांचल या प्रदेशात पिंपळी आढळते. पिंपलीची शेतील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.