दिपावलीत नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंधिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
2/ 7
विठ्ठल -रखुमाई मंदिरात तुळस, शेवंती, झेंडू, अश्टरच्या, जरबेरा, कागडा, कामिनी आणि गुलाब फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक आरास केली आहे. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
3/ 7
विठूरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक फुलांच्या माळांची सजावट केली आहे. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
4/ 7
बीडचे विठ्ठल भक्त श्री करण हनुमान पिंगळे यांच्याकडून ही मंदिर सजावट करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
5/ 7
दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. या आनंदाच्या क्षणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास केली आहे. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
6/ 7
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेली मंदिरे नवरात्रौत्सवापासून सर्वांसाठी दर्शनाला खुली करण्यात आली. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
7/ 7
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून मंदिर परिसरात प्रत्येक सण-उत्सवाला अशाच प्रकारे आकर्षक फुलांची आरास, सजावट करण्यात येत असते. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)