कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज देखील नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. उष्णता तीव्र असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. थंड पाणी आणि सरबत पिण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. काल 26 मे रोजी कल्याण - डोंबिवलीत कमाल तापमान 35 होते तर किमान तापमान 28 होते. आज कमाल तापमान 36 तर किमान तापमान 28 राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.