तापमान आणि हवेतील आर्द्रता यामुळे कल्याण आणि डोंबिवलीकरांना गरमीचा सामना करावा लागत आहे. प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून सावलीचा आधार घेत आहेत. रस्त्यावर बसणारे विक्रेते सावली मिळावी यासाठी छत्र्यांचा वापर करत आहे. काल 25 मे रोजी कल्याण - डोंबिवलीत कमाल तापमान 36 होते तर किमान तापमान 28 होते. आज कमाल तापमान 36 तर किमान तापमान 28 राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.