कल्याण-डोंबिवलीकरांना वाढत्या उष्णतेमुळे दुपारी छत्री घेऊनच घराबाहेर पडावं लागत आहे. वाढत्या उन्हामुळे दिवसा होणारे या शहरांमधील व्यवहार चांगलेच थंडावलेत. काल (बुधवार 24 मे) रोजी कल्याण - डोंबिवलीत कमाल तापमान 36 होते तर किमान तापमान 27 अंश सेल्सियस इतके होते. आज (गुरूवार 25 मे) रोजी कल्याण - डोंबिवलीत कमाल तापमान 37 होते तर किमान तापमान 27 अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस असेच तापमान राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.