तापमान आणि हवेतील आर्द्रता यामुळे कल्याण आणि डोंबिवलीकरांना गरमीचा सामना करावा लागत आहे. घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक रस्त्यावरून चालताना सावलीचा आधार घेत आहेत. थंड पाणी आणि सरबत पिण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. काल 23 मे रोजी कल्याण - डोंबिवलीत कमाल तापमान 36 होते तर किमान तापमान 26 होते. बुधवारी 24 मे रोजी कमाल तापमान 37 तर किमान तापमान 28 राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.