राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच चढला आहे.कल्याण डोंबिवली परिसरातही उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत. तापमान अधिक असल्याने काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. कल्याण - डोंबिवलीत काल 22 मे रोजी कमाल तापमान 38 होते तर किमान तापमान 26 होते. 23 मे रोजी कमाल तापमान 38 तर किमान तापमान 26 राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील काही दिवस असेच तापमान राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.