सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी मे महिना उष्णतेचा नवा उच्चांक गाठताना दिसतोय. यंदा मे महिन्यात तापमान चाळीशीपार असून सध्या हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत.
2/ 7
रोजच्या तुलनेमध्ये आज थोडेसे ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यात अनेक ग्रामीण भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील तर शहरवासीयांना थोडासा उन्हापासून दिलासा मिळेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
3/ 7
घरातील उकाडा कमी करण्यासाठी अनेकांचा कुलर, एसी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे कल पुन्हा वाढला आहे. मध्यंतरी सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसामुळे नागरिकांनी या खरेदीकडे दूर्लक्ष केले होते. पण आता गरज वाढली आहे.
4/ 7
आज सोलापूर जिल्ह्यातील लोकांनाही काहीसा दिलासा असून तापमान चाळीसच्या आतच राहणार आहे. कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 28 अंश सेल्सिअस असे राहील.
5/ 7
सोलापुरात तापमानामुळे उष्माघातासारख्या आजारांचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांनी उन्हात फिरणे टाळावे आणि योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
6/ 7
घराबाहेर पडताना सोबत छत्री किंवा रेनकोट घेऊनच बाहेर पडा , कारण आज पावसाचे देखील संकेत आहेत .
7/ 7
शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास अक्कलकोट तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह तासभर पाऊस झाला. तसा आजही ग्रामीण भागात पाऊस आणि वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.