पंढरपूर माघवारी पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा सोलापुरातील नार्थ कोट मैदान येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या रिंगण सोहळ्याचा आनंद हजारो वारकऱ्यांसह सोलापूरकरांनी लुटलाय. हा सोहळा अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह हजारो वारकरी उपस्थित होते. सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील हजारो वारकऱ्यांनी माघवारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. सोलापुरात गोल रिंगण सोहळा माऊलीच्या नाम गजरात पार पडला. एक फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे माघ एकादशी सोहळ्यासाठी पायी दिंडी सोहळा निघाला आहे. जिल्ह्यातील आलेल्या अनेक दिंड्या यामध्ये सहभागी झाल्या असून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत.