प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. विठ्ठलाच्या मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर अशा तिरंग्याच्या रुपात फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा देव्हारा, गाभारा, चौखांबी, सोळाखांबी आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहेत. ही फुलांची आकर्षक सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. आज प्रजासत्ताक दिन आणि वसंत पंचमी असल्यामुळे दर्शनासाठी मोठ्या संख्येन भाविक मंदिरात येत आहेत. पुण्याचे विठ्ठल भक्त भुजबळ कुटुंबीयांकडून ही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.