शिवसेनेचे खान्देशातील तडफदार नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा कनिष्ठ पुत्र विक्रम सोमवारी (29 नोव्हेंबर) प्रेरणा पाटील यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
शिवसेनेचे खान्देशातील तडफदार नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा कनिष्ठ पुत्र विक्रम सोमवारी (29 नोव्हेंबर) प्रेरणा पाटील यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
2/ 7
विक्रम-प्रेरणा यांच्या हळदीचा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील महाराणा प्रताप चौकजवळ गुलाबराव पाटील यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला होता.
3/ 7
विक्रम-प्रेरणा यांच्या हळदीच्या कार्यक्रमात शेकडो नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी बहुतेकांनी चेहऱ्यावर मास्क लावलेला बघायला मिळाला.
4/ 7
मुलाच्या हळदीच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित पंगतीत गुलाबराव पाटील पाहुण्यांना जिलेबी वाटताना दिसले. त्यांनी अनेकांना जिलेबी भरवली देखील.
5/ 7
विशेष म्हणजे या हळदीच्या कार्यक्रमानिमित्ताने शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे देखील शनिवारी जळगावात दाखल झाले होते. त्यांच्यासह शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर हे देखील आले होते.
6/ 7
विक्रम-प्रेरणा यांच्या विवाह सोहळ्यातील हळदीचा कार्यक्रम रविवारी (28 नोव्हेंबर) संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता.
7/ 7
हळदीच्या कार्यक्रमाला गुलाबराव पाटील यांच्या नातेवाकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.