[caption id="attachment_891371" align="aligncenter" width="4624"] महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असताना सांगलीत गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा हात चढाच राहिला आहे.[/caption] सांगलीतील 2-3 दिवसांत कमाल तापमान हे साधारणतः 39° ते 38° सेल्सिअस तर किमान तापमान 22° ते 23° सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे. सांगलीत वाढत्या तापमानामुळे जनसामान्यांच्या सर्वसाधारण कामांमध्ये अडथळे येत आहेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. सांगलीत काल (24 मे) रोजी कमाल तापमान 36° सेल्सिअस तर किमान तापमान 23° सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. दरम्यान आज (25 मे) रोजी कमाल तापमान 36° सेल्सिअस तर किमान तापमान 24° सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज (25 मे) आकाश पूर्णतः निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.