राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे गेल्या काही दिवसांत राजकारणात सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत. (सर्व फोटो सौजन्य : रोहित पवार फेसबुक पेज)
2/ 10
जिल्हा परिषद सदस्य असलेल्या रोहित पवार यांनी एका जाहीर सभेत बोलताना आपली इच्छा व्यक्त केली आहे.
3/ 10
'फक्त माझ्या एका फोन वर लोकांची काम व्हावीत, अशा पातळीवर मला पोहचायचं आहे,' असं रोहित पवार म्हणाले.
4/ 10
'पक्षाने जर जबाबदारी दिली तर ती शेवटाला नेणार हा माझा शब्द आहे,' असं म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीत मोठी जबाबदारी घेण्यास सज्ज असल्याचं दर्शवलं आहे.
5/ 10
शरद पवार यांचे नातू असणारे रोहित पवार हे सध्या पक्ष संघटनेत चांगलेच सक्रीय झाल्याचं दिसत आहे.
6/ 10
पुणे तसंच इतर जिल्ह्यामध्ये देखील ते पक्षाच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात.
7/ 10
त्यामुळे आगामी काळात रोहित पवार राज्याच्या राजकारणात सक्रिय होतात के हे पाहण्याचं ठरणार आहे.
8/ 10
काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली होती
9/ 10
'जर तुम्हाला हे सरकार जुमलेबाजीचं असं वाटत असेल तर सत्तेतून बाहेर पडा, सत्ता सोडा आणि मंत्र्यांना राजीनामे देण्यास सांगा,' अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
10/ 10
आदित्य ठाकरेंनी भविष्यात जुमलेबाजी सरकार येऊ नये असं साकडं विठ्ठलाला घातलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर रोहित पवारांनी टीका केली होती.