मंदिराला पुराचा वेढा... मात्र नाम सप्ताह काही थांबला नाही, पाहा PHOTOS
मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घालूनही नाम साप्ताह सुरू ठेवणारे काही भाविक दिसत आहेत.
|
1/ 5
श्रावण महिन्यात मोठ्या भक्तिभावाने कोकणातील मंदिरातून नाम सप्ताह पार पडतो. परमेश्वराच्या नामस्मरणात, भजनात, अभंगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच तल्लीन होतात.
2/ 5
अत्यंत पावित्र्य जपत कोकणातील गावागावातून हा सप्ताह पाळला जातो. कुठे एक दिवस तर कुठे सात दिवस खंड न पडता टाळ मृदुंगाच्या गजरात परमेश्वराचे नामस्मरण केले जाते.
3/ 5
रत्नागिरी जवळील तोणदे येथील एक व्हिडीओ समोर आला असून यात मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घालूनही नाम साप्ताह चालू ठेवणारे काही भाविक दिसत आहेत.
4/ 5
मंदिरापार्यंत पोहोचण्यासाठी होडीचा देखील वापर केला गेला.
5/ 5
भजनी मंडळींच्या छातीपर्यंत पुराचे पाणी येऊनही या सप्ताहात त्यांनी खंड न पाडल्याचे दिसत आहे.