Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा गेली अनेक दिवस होती. मात्र या प्रवेशावर अंतिम मोहोर उमटली ती सोमवारी 18 मार्च रोजी.
2/ 5


विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील सोमवारी रात्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यांच्यासोबत भाजपचे दिग्गज नेते होते.
3/ 5


मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि संकटमोचक गिरीश महाजन, ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, हे वर्षावर उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी राजकीय स्थितीवर चर्चा केली.
4/ 5


मुख्यमंत्री, भाजपचे सर्व नेते आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची सविस्तर चर्चा झाली. मतदारसंघातली स्थिती, राजकीय वातावरण त्याचे परिणाम याचा आढावा सर्व नेत्यांनी घेतला.