'राज'पुत्राची राजकारणात एण्ट्री! अमित ठाकरेंबद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहीत नसतील
|
1/ 34
'27 वर्षांत पहिल्यांदाच मी जाहीर व्यासपीठावर बोलत आहे. तुम्ही सर्वांनी आज आणि याआधीही मला जे प्रेम दिलं आहे, ते भविष्यातही द्याल, यासाठी मी आई जगदंबाचरणी प्रार्थना करतो,' असं म्हणत अमित ठाकरे यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला.
2/ 34
अमित ठाकरे यांनी पहिल्याच कार्यक्रमात शिक्षण ठरावही मांडला आहे.
3/ 34
महाराष्ट्राचं राजकारण असो किंवा भारताचं इथे नव्या दमाचे चेहरे तसे फार कमी दिसतात. मात्र याला अपवाद ठाकरे कुटुंब. आपल्या हँडसम आणि राऊडी लूकमुळे सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे फार प्रसिद्ध आहेत.
4/ 34
अमित ठाकरे यांनी डीजी रुपारेल कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी आर्किटेक्चरचंही शिक्षण घेतलं आहे.
5/ 34
24 मे 1992 मध्ये अमित ठाकरे यांचा जन्म झाला. ते 26 वर्षांचे आहेत.
6/ 34
तरुणाईमध्ये अमित यांचे फार क्रेझ दिसून येते.
7/ 34
वडील राज ठाकरेप्रमाणेच अमितही व्यंगचित्रकार आहेत. ते स्केचिंगही करतात.
8/ 34
अमित हे फुटबॉलप्रेमी असून ते स्वतः फुटबॉल खेळतात.
9/ 34
फुटबॉल स्टार रोनाल्डोला भारतात आणण्यात अमित यांची फार मोठी भूमिका आहे.
10/ 34
अमित ठाकरे मनसे विद्यार्थी सेनेतून राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
11/ 34
2017 च्या महापालिका निवडणुकीदरम्यान अमित ठाकरे आजारी होते. मात्र आजारातून बरे झाल्यानंतर ते राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत.पुढे पाहा, जेव्हा ठाकरे कुटुंबीय एकाच फ्रेममध्ये!
12/ 34
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे लग्नबंधनात अडकले आहे. या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबीय एकत्र आले होते.
13/ 34
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह लग्नसोहळ्याला हजर होते.
14/ 34
विशेष म्हणजे, ठाकरे कुटुंबात 28 वर्षांनंतर हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी उद्धव, जयदेव ठाकरे हे सह कुटुंब हजर होते.
15/ 34
मुंबईतील लोअर परळ भागातील 'सेंट रेजिस'मध्ये हा दिमाखदार विवाह सोहळा पार पडला.
16/ 34
या लग्न सोहळ्याला राजकारणी, उद्योग, बॉलिवूड तसंच मराठी चित्रपट सृष्टीतील पाहुण्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
17/ 34
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यावेळी लग्नसोहळ्याला हजर होते.
18/ 34
यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचलना दीदी लग्नसोहळ्याला आल्या होत्या. अमित आणि मिताली यांनी स्टेजवरून खाली येऊन त्यांचा आशिर्वाद घेतला.
19/ 34
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही या लग्नसोहळ्याला हजर होते.
20/ 34
टाटा समुहाचे चेअरमन रतन टाटा यांनी उपस्थितीत राहुन नवदाम्पत्याना आशिर्वाद दिला.
21/ 34
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सहपत्नीक आले होते.
22/ 34
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह या लग्नसोहळ्याला हजर होता.
23/ 34
अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांचा मोठा भाऊ अमित देशमुख हेही यावेळी हजर होते.
24/ 34
बाॅलिवूडचा अभिनेता आमिर खान यानेही लग्नाला हजेरी लावली होती.
25/ 34
लग्नसोहळ्यातील काही क्षणचित्र
26/ 34
या लग्नसोहळ्याला काँग्रेसचे नेते अहमद पटेलही यावेळी हजर होते.